हायवा जाळल्याप्रकरणी कोर्टात अर्ज केल्याचा राग

Foto
सागर प्रकाशनचे
साजवार्ता
Page No.: 8 Date: 14/11/2026
हायवा जाळल्याप्रकरणी कोर्टात अर्ज केल्याचा राग
दोघा भावंडांचा पाठलाग करून रॉडने जीवघेणा हल्ला
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): हायवा वाहन जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात अर्ज केल्याचा राग मनात धरून दोघा सख्ख्या भावंडांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (दि. ५) रात्री सोलापूर-धुळे महामार्गावर आरोपींनी या भावंडांचा पाठलाग करत जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले.
प्राप्त माहितीनुसार, नामदेव रोरे (३६ रा. गट क्र. १३, सिडको गार्डनसमोर, वडगाव को.) यांचा हायवा ट्रक काही दिवसांपूर्वी भांगसी माता गड परिसारात
जाळण्यात आला होता. या प्रकरणी बिरजू तरैय्यावाले व अक्षय बडोगे (दोघ रा. तिसगाव) यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यासाठी नामदेव रोरे यांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता. याचा राग मनात धरून बिरजू तरैय्यावाले, विक्की सलामपुरे, अक्षय बडोगे, अमृत सलामपुरे, गुड्डू खान यांनी गुरुवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास सोलापूर धुळे महामार्गावरील साजापूर शिवारात रोरे यांची कार अडवली. यावेळी बिरजू याने हा लई माजला, आमच्यावर कोर्टातून गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करतोय. आता हा सापडला याला जिवंत सोडू नका असे म्हणत त्याने रोरे यांच्या छातीत लाथ मारून त्यांना खाली पाडले. त्यानतंर बिरजू व विक्की
याने लोखंडी रॉडने तर अक्षय, अमृत व गुड्डू खान यांनी रोरे यांना लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. भावाला मारहाण होत असल्याचे समजल्याने नामदेव यांचा भाऊ योगेश रोरे हे घटनास्थळाकडे येत असताना योगेश सलामपुरे, योगेश शिंदे या सर्वांनी मिळून योगेश रोरे यांना मारहाण करीत पाठलाग करून रॉडने तसेच दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी नामदेव रोरे यांनी २ नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून बिरजू तरैय्यावाले, विक्की सलामपुरे, अक्षय बडोगे, अमृत सलामपुरे, गुड्डू खान, योगेश सलामपुरे, योगेश शिंदे, गोरख भामकर, करण कांबळे तसेच तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions